देश

महाराष्ट्रावर ढगांचं सावट, येत्या 3 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कोकण आणि मुंबईसह राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याआधी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. पण आता अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा आणखी वाढला होता. आजही अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. (Heavy Rain Alert in mumbai and konkan)

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. ९ जून ते १२ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rainfall) हवामान खात्याने (IMD Alert) दिलाय. मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. कोविड रुग्णांना सुरक्षित स्थळी हालवण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत.

राज्यात एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यातबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे सोबत बैठक घेतली होती.

दरम्यान येत्या काही तासात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, रायगड, हिंगोली, पालघर तसेच परभणी या ठिकाणी ही पावसाची शक्यता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button