देश

Jombo Megablock : मुंबईकरांनो, येत्या शनिवार, रविवारी मध्य रेल्वेवर ‘महा’मेगाब्लॉक; CSMT, ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) 1 जून आणि 2 जूनला 36 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block News Latest Updates) घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकात (CSMT Railway Stations) फलाट क्रमांक 10 आणि 11ची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर याच दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातील (Thane Railway Station) फलाट क्रमांक 5 आणि 6ची रुंदी वाढवण्याचं कामंही करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेवर एकाच वेळी दोन्ही ब्लॉक घेण्यात येणार आहे. 36 तासांच्या मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असल्याच सुट्टी देण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं सरकारी आणि खासगी कंपन्यांना केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.

विशेष रात्रकालीन ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या जम्बो मेगाब्लॉकसाठी आधीच मध्य रेल्वेनं 17 मेपासून विशेष रात्रकालीन ब्लॉक सुरू केला आहे. हा ब्लॉक 2 जूनपर्यंत कायम राहणार आहे.

वडाळा-सीएसएमटी, भायखळा-सीएसएमटी लोकल सेवा बंद
शनिवार, 1 जून रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील वडाळा ते ते सीएसएमटी आणि मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्याचा विचार सुरु आहे. तसेच 100 लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी सुमारे 60 टक्के गाड्यांवरही ब्लॉकमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

किती गाड्या रद्द असणार?
शुक्रवारी 4 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 187 लोकल रद्द असणार
शनिवारी 37 लांब पल्ल्याच्या आणि 534 लोकल रद्द असणार
रविवारी 31 मेल एक्स्प्रेस आणि 235 लोकल रद्द असणार
शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
शेवटच्या थांब्यात बदल
शुक्रवारी 11 लांब पल्ल्याच्या तर 12 लोकल
शनिवारी 31 मेल एक्स्प्रेस तर 326 लोकल
रविवारी 18 मेल एक्स्प्रेस आणि 114 लोकल
दरम्यान, सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातात. सीएसएमटी स्थानकातील मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे मध्य रेल्वेने हाती घेतलं आहे. प्लॅटफॉर्म 10 ते 14 चा विस्तार 24 डब्यांच्या गाड्या चालविण्यासाठी करण्यात येणार आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन आणि हार्बर मार्गावर दररोज 1 हजार 810 लोकल चालविण्यात येतात. त्यापैकी 1 हजार 299 हून अधिक लोकल सीएसएमटी स्थानकातून ये-जा करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button