अपराध समाचार
Trending
सिद्धू मुसेवाला हत्या : संतोष जाधव व सौरभ महाकालकडून लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली, पोलिसांची माहिती

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली दिली आहे. तर नवनाथ सुर्यवंशीची संतोष जाधवला आसरा दिल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आली. त्या प्रकरणी मंचर येथून सौरभ महाकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.