देश

Lalbaugcha Raja 2021 : यंदा विराजमान होणार लालबागचा राजा; पाद्यपूजन सोहळा संपन्न

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवर साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. अशातच यंदा मात्र लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती मंडळानं काही दिवसांपूर्वी दिली होती. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळं लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशातच आज लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा पार पडला.

लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 88 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे शुक्रवार म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे. आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थानं लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

जगभरातील गणेशभक्तांचं अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला. कोरोना संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.

यंदा विराजमान होणार लालबागचा राजा

यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिली आहे त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी सुद्धा मंडळा कडून तयारी केली जाणार आहे.

लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सांगितलं की, खरंच लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी कारण काल झालेल्या मंडळाच्या बैठकीत यावर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन ,ऑनलाइन प्रसादाची सुविधा सुविधा केली जाणार आहे.त्यामुळे येथे कुठेही गर्दी होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button