देश

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला

मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Traffic on Konkan Railway route is interrupted due to continuous heavy rain ) रुळावर माती आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्यातील करमाळी जवळ येथे रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. माती आणि पाणी ट्रॅकवर आल्याने अनेक गाड्या अनेक स्थानकात थांबण्यात आल्या आहे. दरम्यान, मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

गोवा राज्यातील कारवार विभागात करमाळी आणि थिविम स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या जुन्या गोवा बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हे पाणी साचल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यादरम्यान, रुळावर मातीही आली आहे. पाणी आणि चिखल यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विविध स्थानकांवर गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

अमृतसर-कोचुवेली स्पेशल ही गाडी पनवेल मार्गे कर्जत – पुणे – मिरज – हुबळी – कृष्णराजपुरम – इरोड – शोरानूर अशी वळविण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील ट्रॅकवर आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

रेल्वे रुळांवर शुक्रवारी माती आल्याने कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार्‍या काही दूरपल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, मडगावपासून मुंबई – दिल्लीच्या पुढील वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. दक्षिणेतील या दुर्घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार्‍या काही गाड्या रद्द तर काही गाड्या अन्य मार्गावरुन वळण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button