देश

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू; एकूण २० रुग्णांवर सुरू आहेत उपचार

करोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची होती. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण २१ रुग्ण होते. त्यांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (a 80 year old delta plus variant covid 19 patient dies in maharashtra)

डेल्टा बनू शकते तिसऱ्या लाटेचे कारण

डेल्टा प्लस व्हेरिएंट हे करोना विषाणूचे बदललेले रूप आहे. हे रुप राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतात करोनाची दुसरी लाट निर्माण होण्याचे डेल्टा प्लस व्हेरिएंट हेच कारण होते. हा डेल्टा सर्वप्रथम भारतात आढळला होता. हा डेल्टा B1.617.2 हे म्यूटेशन आहे.

राज्यात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रत्नागिरीत ९, जळगावात ७. मुंबईत २ आणि पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १ रुग्ण आहे. प्रथम डेल्टा होता. मात्र नंतर डेल्टा प्लस आला. डेल्टाने त्याचे रुप बदलले आहे का, याचा आता बारकाईने अभ्यास सुरू झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. या अभ्यासासाठी राज्यातील ३७ जिल्ह्यातून दर महिन्याला १०० नमुने घेतले जात आहेत. यात त्याचा प्रवास कसा झाला… ज्यांना तो झाला त्यांचे लसीकरण करण्यात आलेले होते का.. अशा गोष्टी तपासल्या जात आहेत. यासाठी आम्ही केंद्राकडूनही मदत घेत आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, यात घाबरण्याचे काही कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र ज्या ठिकाणी डेल्टाचे रुग्ण आहेत अशा ठिकाणी नवे नियम लागू करण्याची काही आवश्यकता नसल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button