
मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवार 31 जुलै रोजी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काही महिन्यांपूर्वी MCA मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात आला होता. आता या स्टेडियमवर माजी क्रिकेटर आणि भारतीय कर्णधार राहिलेल्या सुनील गावसकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. MCA ने स्वतः याबाबत पुष्टी केली असून गावसकरांसोबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा देखील पुतळा येथे उभारण्यात येणार आहे’.
सुनील गावसकरां मिळणार खास भेट :
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक क्रिकेट म्यूजियम बनवलं जात आहे. ज्याचं नाव MCA शरद पवार क्रिकेट म्यूजियम ठेवण्यात आलं असून याच उदघाटन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतं. सुनील गावसकर यांचा पुतळा या म्यूजियमवर ठेवला जाणार असून याशिवाय BCCI आणि MCA चे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांचा पुतळा सुद्धा याच म्यूजियममध्ये ठेवला जाणार आहे.
काय म्हणाले गावसकर?
MCA कडून मिळालेल्या या सन्मानानंतर सुनील गावसकर म्हणाले की, ‘मला हा सन्मान दिल्याबद्दल MCA चे आभार, यामुळे मला खूप आनंद होतोय. माझी मातृ संस्था असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतलाय की माझा पुतळा हा नव्या MCA शरद पवार क्रिकेट म्यूजियमच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येईल. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मी क्रिकेटमध्ये माझं पहिलं पाऊल टाकलं आणि मग मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी यावेळी किती खुश आहे.
शरद पवारांचा पुतळा सुद्धा उभारणार :
शरद पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष SP चे अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते MCA, BCCI आणि ICC अशा क्रिकेटच्या नामवंत संस्थांशी निगडित आहेत. या म्यूजियमला त्यांच्याच नाव देण्यात आलंय. MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईकने सांगितले की, शरद पवार क्रिकेट म्यूजियम मुंबई क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तींसाठी आमची श्रद्धांजलि आहे. हे म्यूजियम त्यांच्या विचारसरणीचे आणि यशाचे प्रतीक आहे. सुनील गावस्कर यांचा पुतळा दृढनिश्चयाचे प्रतीक बनेल, जो तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती सत्यात उतरवण्यास प्रेरित करेल.