Uncategorized

त्सुनामी अख्खा देश संपवणार? जपानी बाबा वेंगानं जे सांगितलं तेच घडतंय; विनाशपर्वाची उलटमोजणी सुरू?

रशियातील (Russia Earthquake) किनारपट्टी क्षेत्रामध्ये आलेल्या 8.7 रिश्टर स्केलच्या महाभयंतर भूकंपाचे पडसाद आशिया खंडापर्यंत पोहोचले असून, त्याचा सर्वाधिक धोका जपानला असल्याचं स्पष्ट होत आहे. पुढील काही तास जपानसाठी अतिदक्षतेचे असून त्सुनामीचा इशारा देण्यात आल्या कारणानं सध्या संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. जपानमध्ये त्सुनामी आल्यास त्याची तीव्रता प्रचंड असून यामुळं देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती प्राथमिक इशाऱ्यानंतर व्यक्त केली जात आहे. यादरम्यानच जपानी बाबा वेंगानं वर्तवलेल्या भाकितानंही नजरा वळवल्या आहेत.

वर्षभरापूर्वी समोर आलेलं विध्वंसाचं भाकित, नेमकं काय सांगितलेलं? (Japanni baba venga tatsuki)
जपानी बाबा वेंगा किंवा नवे बाबा वेंगा अशी ओळख असणाऱ्या Ryo Tatsuki यांनी जपानमध्ये जुलै 2025 मध्ये मोठी नैसर्गित आपत्ती, त्सुनामी येणार अशी भविष्यवाणी केली आणि वर्षभरापासूनच या भाकितानं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. 1999 मध्ये The Future I Saw या पुस्तकामध्ये या जपानी बाबा वेंगाकडून भूकंप आणि त्सुनामीचं हे भाकित वर्तवण्यात आलं होतं. तात्सुकींच्या या पुस्तकामध्ये प्रत्यक्ष आयुष्यातील काही घटना ज्यामध्ये राजकुमारी डाएना यांचा आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू, कोविड महामारी, मार्च 2011 मधील त्सुनामी आणि भूकंप अशी भाकितं करण्यात आली होती.

तात्सुकींना खरचं संकटाची चाहूल लागली होती की काय?
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तात्सुकींच्या या पुस्तकाच्या वाचक आणि त्यांच्या लिखाणावर विश्वास असणाऱ्यांनी जुलै महिन्यातील या भाकितासंदर्भात चिंता व्यक्त केली होती आणि आता त्यांचा प्रत्येक शब्द सत्यात उतरत असल्याचं पाहून ही चिंता भीतीचं रुप घेताना दिसत आहे. प्रत्यक्षात तात्सुकी यांनी 5 जुलै रोजी काहीतरी अघटित घडणार असं म्हटलं आणि त्या दिलशी नेमकं काहीच घडलं नाही, ज्यामुळं जपानसह जगभरात अनेकांनीच ही अफवा असल्याचं म्हटलं. मात्र बरोबर 25 दिवसांनंतर जपानमध्ये महाभयंकर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आणि तात्सुकींना खरचं संकटाची चाहूल लागली होती की काय? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.

सोशल मीडियावर सध्या अनेक नेटकरी जपानी बाबा वेंगाचं हे भाकित आणि त्याच्याशी संबंधित पोस्ट करताना दिसत आहेत तर, काही नेटकरी आपली मतं मांडत आहेत. एकंदरच जपानवर असणारं एक भयावह संकट संपूर्ण जगालासुद्धा चिंतातूर करून गेल्याचं इथं पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button