रेशन कार्ड, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल, जाणून घ्या

रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नव्या नियमासंदर्भात ही माहिती आहे. शिधापत्रिका आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे, ज्यामुळे बनावट कार्डांना आळा बसेल. तसेच गॅस बुकिंगची माहिती एसएमएस आणि अॅपच्या माध्यमातून मिळणार असून अनुदान थेट बँक खात्यात येणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होणार आहे. योग्य लोकांचा फायदा व्हावा आणि चुकीचे काम करणाऱ्यांना आळा बसावा हे सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे शिधापत्रिका आधारशी जोडणे, बायोमेट्रिक तपासणी, गॅस बुकिंगचे डिजिटल मॉनिटरिंग आणि सबसिडी थेट बँक खात्यात वर्ग करणे अशी पावले उचलण्यात आली आहेत.
रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक
वास्तविक, आता रेशनकार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे बनावट शिधापत्रिका बनवता येणार नाहीत. जे लोक चुकीच्या पद्धतीने रेशन घेत होते ते आता तसे करू शकणार नाहीत. यामुळे डुप्लिकेट आणि बनावट कार्डला आळा बसेल, असे सरकारचे म्हणणे आहे. रेशन घेताना बोट किंवा डोळ्यांची ओळख आवश्यक असेल. यामुळे तुमच्या नावाने दुसरे कोणीही रेशन घेऊ शकणार नाही.
गॅस बुकिंगसाठी करावे लागणार ‘हे’ काम
तसेच गॅस बुक केल्यावर तुम्हाला एसएमएस आणि अॅपवरून संपूर्ण माहिती मिळेल. गॅसचे बुकिंग केव्हा झाले, केव्हा भरले आणि केव्हा मिळेल हे कळेल. यामुळे डिलिव्हरीमध्ये होणारा अडथळा टाळता येईल. गॅस सबसिडी आता फक्त त्यांनाच मिळणार आहे, ज्यांचे आधार आणि बँक खाते गॅस कनेक्शनशी जोडलेले आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने सबसिडी घेतली आहे त्यांना आता हा लाभ मिळणार नाही. उज्ज्वला योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
कुणाला त्रास होणार?
नवे नियम लागू झाल्यानंतर ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण ज्यांचे आधार लिंक नाही किंवा बँकेचा तपशील चुकीचा आहे, त्यांना तात्काळ दुरुस्त करावे लागेल. अशा लोकांनी सावध राहावे अन्यथा रेशन आणि गॅस दोन्ही बंद होऊ शकतात, असा इशारा सरकारने दिला आहे. अशा वेळी तुमची कागदपत्रे ताबडतोब दुरुस्त करून घ्या, जेणेकरून भविष्यात त्रास होईल.