खेलदेश

IND VS ENG : दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पाऊस बनणार व्हिलन? Weather Report ने वाढवलं टेन्शन

भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा बर्लिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेटने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या टेस्ट सामन्यात विजय मिळवून सीरिज बरोबरीत आणण्याचं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आलंय. तेव्हा शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) कशी कामगिरी करते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. टीम इंडियाच्या विजयाच्या मार्गात केवळ इंग्लंडचा संघच नाही तर पाऊस सुद्धा अडथळा आणू शकतो. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान बर्लिंघम येथील हवामान कसं असेल याविषयी जाणून घेऊयात. 

बर्मिंघमचं हवामान कसं असणार? 

बर्मिंघममधील हवामानाबाबत चांगली माहिती समोर आलेली नाही. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान मधून मधून पावसाचं आगमन होऊ शकतं. लीड्स टेस्टमध्ये सुद्धा काही सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु तसं झालं नाही, पावसाच्या हलक्या सरी पडल्या मात्र त्याचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही. तेव्हा आता दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

एजबेस्टनमध्ये खेळवण्यात आले 60 टेस्ट सामने : 

एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 60 टेस्ट सामने खेळवण्यात आले असून या मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये सरासरी स्कोअर 302 धावांचा राहिला आहे. तर दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा फलंदाजीचाच दबदबा पाहायला मिळालाय. दुसऱ्या इंनिंगमध्ये सुद्धा सरासरी स्कोअर 302 धावा हा आहे. तथापि, चौथ्या इनिंगमध्ये पिच कठीण होते. शेवटच्या इनिंगमध्ये सरासरी धावसंख्या ही 157 धावा आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

बर्मिंघमचा वेदर रिपोर्ट : 

बीबीसी वेदरनुसार, 2 जुलै म्हणजेच पहिल्या दिवशी स्थानीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता (भारतीय समयानुसार दुपारी 3:30) वाजता खेळ सुरु होण्यापूर्वी पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर स्थितीत सुधार होऊ शकतो. बर्मिंघममध्ये अधिकतर चांगलं वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button