देश

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! लोनचा EMI कमी होणार; RBI कडून सलग तिसऱ्यांदा दिलासा

भारतीय रिझर्व्ह बँकने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयच्या पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सर्वसामान्यांना दिलासा देत सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता सर्वप्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहेत. आरबीआयने यंदा 0.50 टक्क्याने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करण्यात आल्याने सर्व कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. 

व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात झाल्यानंतर आता रेपो रेट 6.00 %ने घटून 5.50 % झाला आहे. या आधीही फेब्रुवारी 2025 आणि एप्रिल 2025मध्ये दोनदा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर रेपो पेट 6.00 टक्क्यांवर पोहोचला होता. आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या व्याज दरात कपात होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या EMI वर होणार आहे. 

आरबीआय गव्हर्नर यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, विकास वाढवण्यासाठी व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारात अनिश्चितता कायम आहे. जगभरातील संस्थांनी जागतिक विकासदर कमी केला. जागतिक अनिश्चिततेमध्येही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूकदारांसाठी खूप संधी आहेत. आरबीआयने आपला दृष्टिकोन अनुकूलतेपासून तटस्थ असा बदलला आहे.

रेपो रेट कमी झाल्यावर त्याचा थेट परिणाम बँक लोन घेणाऱ्या ग्राहकांवर होतो. रेपो रेट कमी झाल्यास ईएमआय कमी होतो. रेपो रेटमध्ये बंपर कपात झाल्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं की, बैठकीत SDF रेट 5.75 ने घटून 5.25 टक्के करण्यात आला आहे. तर MSF रेटदेखील 6.25 टक्क्यांने घटून 5.75 टक्के करण्यात आला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिनिष्चिततेचा उल्लेख करत आर्थिक वर्ष 2026 चा अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज 3.7 टक्के ठेवण्यात आला आहे. यापहिले हा अंदाज 4 टक्के वर्तवण्यात आला होता. त्याचबरोबर RBI Governor यांनी म्हटलं आहे की, कॅश रिझर्व्ह रेशियो (CRR) देखील 4 टक्क्यांनी 100 बेसिस पॉइंट घटवून 3 टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

50 लाखांच्या लोनवर किती कमी होईल EMI 

जर तुम्ही बँकेकडून 50 लाखांचे होम लोन 30 वर्षांसाठी घेतले आणि त्याबदल्यात तुम्ही 9 टक्क्यांनी व्याज देत आहात तर तुमचा महिन्याचा हफ्ता 40,231 रुपये होईल. RBI रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंटची कपात झाल्यानंतर आता हा ईमएआय कमी होऊन 38,446 रुपये होणार आहे. म्हणजेच तुमचा महिन्याचा EMI मध्ये 2000 रुपयांची कपात होणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button