अपराध समाचार

Bandra Crime : २३ लाख परस्पर काढले, जाब विचारताच लेकीच्या बालमित्राने जीव घेतला, वांद्य्रातील वृद्धेच्या मृत्यूचं गूढ उकललं

वांद्रे पश्चिमेकडील एका सोसायटीमध्ये कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या वृद्ध महिलेच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. रेखा खोंडे (६४) असे या मृत महिलेचे नाव असून शेजारी राहणाऱ्या आणि परिचयातील तरुणानेच त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी शरीफ अली शेख (२७) या आरोपीला या प्रकरणी अटक केली आहे. आरोपीने वृद्ध महिलेची हत्या का केली? जाणून घ्या.

आरोपी शरीफ अली शेख हा हत्या केलेल्या रेखा खोंडेंच्या मुलीचा बालपणीचा मित्र होता. रेखा खोंडे याच्या कुटुंबाला तो लहानपणापासून ओळखत होता. वांद्रे रेक्लमेशन येथील कांचन को ऑप सोसायटीमध्ये रेखा या एकट्या वास्तव्यास होत्या. त्यांची मुलगी आपल्या परिवारासह मालाड येथे राहायची. खोंडेंच्या पतीचे २०१७ मध्ये निधन झाले होते. एकट्याच असल्याने शरीफ शेखने त्यांना बँकेच्या कामात, दवाखान्यात जायला, किराणा खरेदी करून देणे अशी मदत करू लागला. रेखा एकट्याच असल्याने त्यांनाही त्याचा आधार होत होता. शरीफ शेखने या गोष्टींनी त्यांचा विश्वास जिंकला होता. त्यामुळे त्यांचा मोबाईलही त्याच्याकडे असायचा पण याचा फायदा त्याने घेतला. रेखा यांच्या मोबाईलवरून तो आपल्या फोनमध्ये पैसे घेऊ लागला होता. तीन महिन्यांमध्ये त्याने २३ लाख रूपये आपल्या खात्यावर वळवून घेतले होते.

रेखा खोंडे या शरीफ त्यांच्या फोनमधून फसवणूक करत पैसे घेत असल्याची माहिती मिळाली. ५ फेब्रुवारीला रेखा यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा त्याचा त्यांच्याशी वाद झाला होता. यादरम्यान त्याने रेखा यांना संपवलं आणि घरातील दागिने घेऊन फरार झाला होता. मात्र काही कारणावरून दोघींमध्ये वाद झाल्याने रेखा यांची मुलगी महिनाभरापासून आईकडे आली नव्हती.

सोमवारी रेखा यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागला. त्यावेळी आरोपी शरीफ याने त्यांच्या मुलीला फोन लावून चावी घेऊन यायला सांगितलं. दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला त्यावेळी रेखा यांचा मृतदेह कुजलेला स्थितीत आढळला. मतृदहे सापडला तेव्हा त्यांचे हात बांधलेले होते. डोक्यावर प्रहार करून तसेच गळा आवळून रेखा यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज येताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने पोलिसांना रेखा आणि त्यांच्या कुटुंबाबत माहिती दिली. पोलिसांना त्याच्यावरच संशय आला होता. आरोपी शेखवर क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीमध्ये झालेला तोटा आणि स्वखर्चामुळे त्याच्यावर १५ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

गुन्हा घडलेल्या घरामध्ये जबरदस्तीने घुसलेल्या कोणत्याही खाणाखूणा नव्हत्या. त्यामुळे कोणीतरी जवळचा व्यक्ती असणार असा अंदाज पोलिसांना आला होता. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची कसून चौकशी केली. रेखा यांचे नातेवाईक, शेजारी, त्यांच्या परिचयातील व्यक्ती यांची चौकशी करतानाच दुसरीकडे सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले. यावेळी शरीफ याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी शरीफ याला न्यायालयात हजर केले असता त्याची १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button