अपराध समाचार

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

राजधानी मुंबईत (Mumbai) परप्रांतीय किंवा विशेषत: काही उत्तर भारतीय नागरिकांकडून मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यासह काही लोकांकडून महिलांवर अत्याचार, विनयभंगाचेही प्रकार घडले आहेत. अशावेळी मुंबईतील मराठी माणसांच्या न्यायासाठी किंवा त्यांच्या समस्येला न्याय देण्यासाठी मनसे (MNS) पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने पुढे येतात. आताही मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात इन्फिनिटी मॉलमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय युवकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्ररणी पीडित महिलेनं स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करताचा, मनसैनिकांनी हिसका दाखवून तरुणाला माफी मागण्यास भाग पाडले.

ओशिवरा येथील इन्फिनिटी मॉलमध्ये असलेल्या रिलायन्स फ्रेश सिग्नेचर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी महिला कर्मचाऱ्याचा परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून फोटो काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याचा मोबाईलमधून फोटो डिलीट करत समज देऊन सोडून दिले. मात्र, महिलांनी पोलिसाकडे तक्रार केल्याचा राग धरून रिलायन्स फ्रेश सिग्नेचर कंपनीने महिलेस कामातून काढून टाकले. त्यामुळे, पीडित महिलेने मनसेकडे मदत मागितल्यानंतर मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मॉलमध्ये जाऊन रिलायन्स फ्रेश कंपनीला जाब विचारला. तसेच, विनयभंग करणारा आकाश शर्मा या परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसे स्टाईलमध्ये चोपही दिला. त्यासोबतच आरोपी कर्मचाऱ्याला महिलेची माफी मागायला लावली. तर, मॉलकडे त्या महिलेला पुन्हा कामावर ठेवण्याबाबत विचारणा केली.

दरम्यान, मनसेच्या दणक्यानंतर आरोपी तरुणाने कान धरुन महिलेची माफी मागितली. तर, या युवकास मॉलमधील कामावरुन काढण्यासही मनसेनं सांगितलं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या मराठी महिलेला न्याय मिळून दिल्यामुळे महिलेने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button