देश

टोसिलीझुमॅबचा काळाबाजार, दोन डॉक्टरांसह तिघांना अटक

टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार (Tosilizumab injection black market) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केला आहे. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह तीन जणांना पोलिसांनी अटक केलीय.याप्रकरणातील आरोपींचे मध्यप्रदेश कनेक्शन आढळून आलेय. याप्रकरणी पोलिसांनी सचिन गोवरीकर (20, जिल्हा बालाघाट ,मध्य प्रदेश), होमओपॅथी डॉक्टर सोनू बाकट ( परसरवाडा, बालाघाटा,मध्य प्रदेश) रामफल वैश्य असे तिसऱ्या आरोपीचे नाव आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत बेडसह काही औषध मिळतातना रुग्णाचा नातेवाईकांची चांगलीच धावाधाव होतेय. टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा आहे.त्यामुळं या इंजेक्शनचा तुडवला असल्याचा गैरफायदा अनेकजण घेतात. मूळ किंमतीपेक्षा दुप्पट आणि तिप्पट किंमतीत काळाबाजारात त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी सोनू याच्याकडे बनावट ग्राहक पाठवले आणि त्याच्याशी टॉसिलीझुमॅब इजक्शनची गरज असल्याचं सांगितले.

आरोपीनं एक टॉसिलीझुमॅब एक लाखांची मागणी केली. बनवाट ग्राहकानं तयारी दर्शवली. त्यानंतर आरोपी पोलिसांनी अलगद सापळ्यात अडकवले..याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आणि झाडाझढती घेतल्यानंतर दोन बीएचएमएस डॉक्टरांसह तिन जणांना अटक केली आहे.

कोरोनाच्या काळात बेड, ऑक्सिजन तुडवडा यांमुळे कोरोनाग्रस्तांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनाजीव सुद्धा गमावाव लागला. त्यातही औषधांच्या हा काळाबाजामुळे अगोदर सर्वसामान्य संतप्त होते. त्यात टॉसिलीझुमॅब इंजेक्सनचा काळाबाजार झाल्याचे उघडकीस आले आहे. या काळ्याबाजारात दोन डॉक्टरांचा समावेश असल्याने त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी जोर धरु लगाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button