देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात, मुख्य न्यायमूर्तींची घेतली भेट Mansi Kshirsagar |

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज अचानक उच्च न्यायालयात भेट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल व महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट होती, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर, हायकोर्टात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण सुरु असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे, असंही सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत पुढं काय पावलं उचलावी, कोणते निर्णय घेणं योग्य ठरेल याविषयी न्यायमूर्तींसोबत चर्चा झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तर, एकीकडे मुंबई उच्च न्यायालयात करोना विषयक याचिकांवर प्राधान्यानं सुनावणी घेण्यात येत आहे. न्यायमूर्तींनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला अनेक सूचना केल्या होत्या. ऑक्सिनज तुटवडा, रेमडेसिव्हीर, लॉकडाऊन यावरुन अनेकदा न्यायालयानं राज्य सरकारची कानउघडणी केली होती. तसंच, करोनाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात देलेल्या अचानक भेटीमुळं अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button