मनोरंजन

प्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?

मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट उद्या म्हणजेच 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं आहे. या चित्रपटाचा पहिला टिझर जेव्हा प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाचा अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर आता दुसरा टिझर पाहता अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. त्यासाठी चित्रपटाची प्री बुकिंग सुरु झाली. प्री बुकिंग पाहता त्यानं कोटींचा आकडा प्रदर्शनापूर्वीच पार केला आहे. मोठ्या मोठ्या मल्टीप्लेक्समध्ये ‘आदिपुरुष’ च्या तिकिटांची किंमत ही तर खूप जास्त आहे. तरी देखील अनेकांना तिकिट मिळत नाही आहे. एकावेळी इतक्या लोकांनी बुकिंग करण्याचा प्रयत्न केला की बुकिंग साइट क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.

साइट झाली होती क्रॅश
या चित्रपटाचा विचार केला तर त्याविषयी लाखोंच्या संख्येनं लोकांना क्रेझ लावलं आहे. याविषयी या कारणामुळे म्हटलं जात आहे कारम अनेक ठिकाणांहून बुकिंग साइट क्रॅश झाल्याची बातमी समोर आली आहे. यात आंध्रप्रदेश सरकारनं एक नोटिस जारी करत सांगितले की चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी पर्यंत फक्त 50 रुपये तिकिटामागे वाढवले जाऊ शकतात.

दिल्लीत तिकिटांच्या किंमतीविषयी बोलायचं झाले तर, एनसीआरमध्ये सगळ्यात जास्त तिकिट विकली आहेत. बूक माय शो अनुसार, पीव्हीआर डायरेक्टर्स कट, एम्बिएंस मॉलमध्ये असलेल्या शोच्या तिकिटांची किंमत ही 2200 रुपये इतकी आहे. 2डी हिंदीच्या पिव्हीआर : वेगास लक्स, द्वावरकेत तिकिट हे 2 हजार रुपयात विकले जात आहे. तर दिल्लीत सकाळच्या शोसाठी 700 रुपये आकारले जात आहेत. दुसरीकडे हैद्राबाद सिलव्हर पासून प्लॅटिनम पर्यंत तिकिट रेट विषयी बोलायचे झालं तर तिथे 250 ते 400 रुपये तिकिटांची किंमत आहे. दुसऱ्या मेट्रो शहरांविषयी बोलायचे झाले तर तिथे 400 रुपयाच्या आत तिकिट विकली जात आहेत. तर रेकलाइनरसाठी काही ठिकाणी 600 रुपये पर्यंत तिकिट आहेत.

दरम्यान, या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंह, सोनल चौहान हे कलाकार दिसणार आहेत. तर हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. हेच कारण आहे की चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची चर्चा होणं हे चांगलं ठरू शकतं. त्यामुळे हा चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणं ही शक्यता असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे तिकिटांच्या बुकिंगचा आकडा हा सतत वाढत आहे. तर मोठ्या मोठ्या शहरात अनेक थिएटरर्सच्या बुकिंग फूल झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button