Maharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे (Shivsena Symbol) गटाला दिल्यानंतर शिंदे गटाने (Shinde Group) आता ठाकरे गटाला (Thakceray Group_ आणखी एक धक्का बसला आहे. संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो काढण्यात आले आहेत. संसदेच्या शिवसेना कार्यलयात आता उद्धव ठाकरेंच्या फोटोच्या जागी आनंद दिघेंचा (Anand Dhighe) फोटो लावण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या फोटोच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
राज्यातील विधीमंडाळातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाकडे आल्यानंतर आता संसदीतल शिवसेनेचं कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. ठाकरे गटाकडून संसदेतल्या ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्याही रद्दबादल करण्यात आल्या आहेत. संसदेत आता शिवसेना शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांचा व्हिप चालणार आहे. तसंच याआधी मुख्यनेतेपदी संजय राऊत होते, पण आता हे पद गजानन किर्तीकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आजपासून नियमित सुनावणी सुरु झालीय.. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद केला. सत्तास्थापनेबाबत राज्यपालांचं पत्र रद्दबातल ठरवा अशी मागणी ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी केलीय. आता कोर्टात ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरू आहे. व्हीपबाबत हा युक्तीवाद केला जात आहे. प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती चुकीची ठरते असा युक्तिवाद कामत यांनी केली
संजय राऊत यांची टीका
सत्तासंघर्ष नाही तर ही चोरांसोबतची लढाई आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे नाव आणि निवडणूक चिन्हं गेलं असं ते म्हणाले.
भाजप-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध
भाजप आणि ठाकरे गटातलं शाब्दिक युद्ध आता इतिहासावरुन सिनेमावर आलंय..अमित शाहांच्या महाराष्ट्र दौ-यानंतर उद्धव ठाकरेंनी शाहांना मोगॅम्बो म्हणत टीका केली होती. त्याला भाजपनेही आता सडेतोड प्रत्युत्तर दिलंय… उद्धव ठाकरे म्हणजे हिंदी चित्रपटातील असरानी आहेत अशी बोचरी टीका आशिष शेलारांनी केलीय.