2000 अश्लील व्हिडिओ आणि… भारतातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल; माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणात दोषी

भारतातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडल प्रकरणात मोठी अपडेट सोमर आली आहे. कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देश हादरून गेला. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवावरच सेक्स स्कँडलचा आरोप करण्यात आला. प्रज्वल रेवन्ना याचे 2000 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले. जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रेवन्ना यांच्या घरात काम करणा-या मोलकरणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला. प्रज्वल रेवन्ना या प्रकरणात दोषी आढळले आहेत.
जेडीएसमधून हकालपट्टी केलेले माजी जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालय शनिवारी शिक्षा सुनावणार आहे. 2024 मध्ये दाखल झालेल्या चार गुन्हेगारी प्रकरणांमध्ये प्रज्वल रेवण्णा हा मुख्य आरोपी आहे. लैंगिक शोषणाच्या 2000 हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप्स इंटरनेटवर व्हायरल झाल्या. जनता दल सेक्युलरमधून विजयी होऊन खासदार झालेले प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत . माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना 47 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. प्रज्वल रेवण्णा यांची सेक्स टेप लीक झाल्यानंतर कर्नाटक सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णाविरुद्ध दाखल असलेल्या चार बलात्काराच्या प्रकरणांमध्ये हा निकाल आला आहे. बंगळुरू न्यायालय शनिवारी रेवण्णाविरुद्ध शिक्षा सुनावणार आहे. प्रज्वल रेवण्णाविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत अनेक आरोप लावण्यात आले होते. यामध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि पुरावे नष्ट करणे यांचा समावेश आहे. ज्या प्रकरणात रेवण्णाला दोषी ठरवण्यात आले आहे. हा खटला हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. बेंगळुरूमधील विशेष न्यायालयाने 18 जुलै रोजी बलात्कार प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली. त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला.
रेवण्णाविरुद्ध पहिली तक्रार एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर घरगुती काम करणाऱ्या एका महिलेने दाखल केली होती. तिने रेवण्णा यांच्यावर 2021 पासून वारंवार बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास अत्याचाराचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या रेवण्णाच्या व्हिडिओंमुळे भाजपही अडचणीत आली होती. रेवण्णा यांना 31 मे रोजी जर्मनीहून परतल्यानंतर अटक करण्यात आली होती. विमानतळावर उतरताच रेवण्णा यांना अटक करण्यात आली.
म्हैसूरमधील केआर नगर येथील एका घरगुती नोकराच्या तक्रारीवरून प्रज्वल रेवण्णाविरुद्ध सीआयडी सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. माजी खासदाराने पीडितेवर बलात्कार केल्याचा आणि त्या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुमारे 2000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान, पथकाने एकूण 123 पुरावे गोळा केले.