इंग्लंडने टॉस जिंकला! संघात 24 वर्षीय खेळाडूची एंट्री, कॅप्टन गिलने ‘या’ खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा टेस्ट सामना हा 23 जुलै पासून खेळवला जातोय. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून हा सामना सीरिजमधील अत्यंत महत्वाचा असणार आहे. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना हा भारताने तर दोन सामने हे इंग्लंडने जिंकले. ज्यामुळे इंग्लंडने सीरिजमध्ये 1-2 ने आघाडी घेतली आहे. सीरिजमध्ये इंग्लंडशी बरोबरी साधायची असेल तर टीम इंडियाला (Team India) मँचेस्टर येथे होणारा चौथा सामना काहीही करून जिंकावा लागेल. तेव्हा या सामन्यासाठी टॉस पार पडला असून हा टॉस इंग्लंडने जिंकला आहे.
मँचेस्टरच्या चौथ्या टेस्ट सामन्यात झालेला टॉस हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला असून त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. तर भारताला यामुळे प्रथम फलंदाजीचं आव्हान मिळालं आहे. 24 वर्षीय खेळाडू अंशुल कंबोज याने भारतीय टेस्ट संघातून इंग्लंड विरुद्ध पदार्पण केलं आहे. त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आलीये. तर गोलंदाज जसप्रीत बुमराह सुद्धा या सामन्यात खेळणार आहे.
टीम इंडियात झाले बदल :
लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या तुलनेत टीम इंडियात मोठे बदल झाले आहेत. करूण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी देण्यात आली असून दुखापतग्रस्त झालेल्या आकाशदीप आणि नितीशकुमार रेड्डीच्या जागी अंशुल कंबोज आणि शार्दूल ठाकूर यांची प्लेईंग ११ मध्ये एंट्री झालीये.
भारताची प्लेईंग 11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
इंग्लंडची प्लेईंग 11 : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर