Uncategorized

वैष्णवी प्रकरणात तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे

हगवणे कुटुंबाच्या रानटी अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक त्रुटी असल्याचं विधिमंडळाच्या महिला, बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालांमधून समोर आलं आहे. या समितीने पोलिसांच्या पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढताना जालिंदर सुपेकर यांची सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. या अहवालाचा तपशील समोर आला असून यामध्ये जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यावर रुखवताच्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी चौकशी करून त्यांना सुद्धा सहआरोपी करण्यात यावे, असेही अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप तपासादम्यान समोर
या प्रकरणी हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप तपासादम्यान समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तापसापासून सुपेकर यांनी दूर ठेवावे असा अहवालात म्हटलं आहे. सुपेकरांची एक ध्वनीफित प्रसारीत झाली आहे. तिची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) विभागाकडून तपासणी करून सुपेकरांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना सहआरोपी करावं, असं अहवालात नमूद करण्यात आला आहे.

दरम्यान, अहवालामध्ये आत्महत्या दिसत असली तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करून त्यांचा सहभाग असल्यास त्यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची आवश्यकता असल्याचे सुद्धा या समितीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे. विधिमंडळाच्या महिला व बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे. या पहिल्या अहवालामध्ये सुपेकरांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

पुरावे सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी
या समितीकडून सरकारला व्यवस्थेमधील त्रुटी दूर करण्यासाठी सुद्धा विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. वैष्णवीचा पती सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण, छळ, जाच होत असल्याचे आणि हुंड्याच्या माध्यमातून ब्रॅण्डेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम विविध वस्तू घेतल्याचे सबळ पुरावे असल्याचे सुद्धा म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तातडीने तपास पूर्ण करून आरोपी आणि सहआरोपींविरोधात पुरावे सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सुद्धा अहवालात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button