Uncategorized

Mumbai Crime : मुंबईत धक्कादायक घटना, पाळणाघरातील लहान मुलींसोबत लैंगिक चाळे, चिमुकलीला मोबाईल फोन दिला अन्…

मुंबईच्या दिंडोशी (Dindoshi) येथील संतोष नगर (Santosh Nagar) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 5 ते 6 अल्पवयीन मुलींवर 44 वर्षांच्या आरोपीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police) आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे. (Mumbai Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा घरात ट्युशन चालवायचं आणि पाळणाघर देखील चालवायचा. अनेक लहान मुलं या आरोपीच्या घरी पाळणाघरात आणि ट्युशनसाठी येत होते. आरोपीच्या घराशेजारी राहणारी 7 वर्षाची मुलगी आरोपीचे घरी ट्युशनसाठी आली असता आरोपी त्या मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला. यानंतर मुलीला मोबाईलमध्ये गेम खेळण्यासाठी देऊन त्याने मुलीचा विनयभंग केला.

आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
हा प्रकार उघडकीस येताच दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर तपासात त्याने आतापर्यंत 5 ते 6 लहान मुलींसोबत अशाप्रकारे विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला दिंडोशी पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या आरोपीने आणखी किती लहान मुलींचा विनयभंग केला आहे? याबाबत अधिक तपास करत आहेत.

पोलीस कॉन्स्टेबलकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मुंबईतील सात रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी, 12 जुलै रोजी, आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी प्रसाद घेण्यासाठी आपल्या इमारतीबाहेर आली असता, आरोपी पोलीस कॉन्स्टेबलने तिचा पाठलाग सुरू केला. लिफ्टमध्ये प्रवेश करण्याचा तिचा प्रयत्न असताना, आरोपीने तिला अडवले आणि जबरदस्तीने तिचा हात पकडत तिला जिन्याद्वारे पहिल्या मजल्यावर ओढत नेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने तातडीने घरी जाऊन आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, कलम 78 तसेच “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास करत घटनास्थळी लागलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याच्या आधारे आरोपीस ओळखून ताब्यात घेतले. आरोपी सध्या ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button