दुनियादेश

व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकावलं तरी आश्चर्य वाटणार नाही; संजय राऊत म्हणाले, आपल्याकडेही सर्व अदानीच्या घशात जाणार…

देशात सध्या वक्फ बोर्डवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलंय .भाजप सरकारची उद्योगपतींची दोस्ती आणि वक्फच्या जमिनी यावरून बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलोन मस्क याच्या दोस्ती वरून अमेरिकेची जनता सध्या रस्त्यावर उतरली आहे .यावर ‘अमेरिकेच्या जनतेचा यावरून अभिनंदन केलं पाहिजे .लोकशाही काय असते आणि ती वाचवण्यासाठी जनता काय करू शकते तसा अमेरिकेत आत्ता दिसतंय . अमेरिकेच्या पन्नास राज्यांमधील जनता तिकडले अदानी इलोन मस्क (Elon Musk) यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे . भारतामध्येसुद्धा अशा प्रकारचा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली आहे .ती होणार .व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकावला तरी आश्चर्य वाटणार नाही’ असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत . जशी अमेरिका विकली जाते आहे हा देश मोदी आणि अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय .वक्फचे विधेयक ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. असेही राऊत म्हणालेत.

काय म्हणाले संजय राऊत?
‘देश विकला जातोय . जशी अमेरिका विकली जाते आहे हा देश मोदी आणि अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय .वक्फचे विधेयक ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे .हे सर्व काही अदानींच्या घशात जात आहे हे स्पष्ट आहे .धारावीपासून वर्क बोर्डापर्यंत .एलोन मस्कला ज्या पद्धतीने अमेरिका विकली जातेय .उद्योगपती एलोन मस्कचा सरकारी धोरणांमधील हस्तक्षेप असल्याचं सांगतात आपल्याकडे नाही का असंही राऊत म्हणाले . उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळेच तो तुमच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करू शकतो ना . जसा तिकडे एलोन मस्क तसा आपल्याकडे दोन ते चार उद्योगपती देश चालवतात .उद्योगपतींचे सोयीना धोरण बदलली जातात .कामगार कायदे बदलले जातात .अमेरिकेच्या 50 राज्यात ज्याप्रमाणे जनता उतरली .उद्या ट्रम्प च्या व्हाईट हाऊस मध्ये घुसून त्याला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही . आपल्या देशातही असंच होणार आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका वाटते असेही राऊत म्हणाले .देशात शेअर मार्केट कोसळला असलं तरी पंतप्रधान मोदी परदेशात फिरतायत .आपल्या देशात काय कोसळले याचा त्यांना काही काय पडलंय .ते वीस कोटी रुपयांच्या आलिशान विमानातून फिरतात .परदेशी पंतप्रधानाला मिठ्या मारतात आणि त्यांचे अंध भक्त इथे बघातात मोदींचे परदेशात काय स्वागत होतं .तू देशाचा प्रधानमंत्र्यांचे स्वागत आहे मोदींचं नाही .’असेही राऊत म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button