worldदेश

शिमला एयरपोर्ट पर एक बड़ा विमान हादसा होते-होते टल गया. यहां रिलायंस एयर की एटीआर फ्लाइट आधे रनवे पर लैंड हुई. उसे इमरजेंसी ब्रेक से रोका गया. इस फ्लाइट में हिमाचल प्रदेश के उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री सवार थे. विमान में हिमाचल के DGP भी मौजूद थे. 

 राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवारी (दि. 24) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि कुशावर्त ति‍र्थाची देखील पाहणी केली. तर नाशिक येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तयारीचा आढावा देखील घेतला. मात्र, गृहमंत्री नाशिकमधून रवाना झाल्यानंतर रात्री शहरात (Nashik News) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढत युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरात काल रात्री जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या कुरापतीतून एका 19 वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप वार केले आहेत. दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर ही धक्कादायक घटना घडली आहे.  

हल्ल्यात युवक जखमी

रितेश लाटे असे जखमी युवकाचे नाव असून स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून मारहाण करणाऱ्या संशयितांनी काही नावे पोलिसांना समजले असून पोलिसांची विविध पथके संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. आता संशयितांनी पकडण्यात पोलिसांना यश कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

मद्यपीने स्वच्छता कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवलं

दरम्यान, . ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून  स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपीला हटकल्याने अंगावर पेट्रोल टाकून ‘हॅपी होली’ म्हणून कर्मचाऱ्याला पेटवून दिले. बसस्थानकाच्या आवारात पुन्हा येऊ नको, असे मद्यपीला बजवल्यानं त्याने कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती समोर येत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याला पेटवणाऱ्या शुभम जगतापला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. तर स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हा सुमारे 60 टक्के भाजला आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button