
भारतीय शेअर बाजारात 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा मजबूत होईल आशा दिसत होती. स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये तेजीचं चित्र दोन दिवस पाहायला मिळालं. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवारपर्यंत तेजी ओसरली होती.
शुक्रवारी सेन्सेक्स 425 अंकांनी घसरुन 75311 अकांवर बंद झाला. 6 जून 2024 ला सेन्सेक्स याच्या देखील खाली होती. निफ्टी 50 देखील 117 अंकांनी घसरुन 22796 अंकांपर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं.5 जून 2024 ला देखील हीच स्थिती होती. या आठवड्यात सेन्सेक्स 0.8 टक्के तर निफ्टी 50 0.6 टक्क्यांनी घसरला. मधले दोन दिवस तेजीमध्ये असणारे मिड कॅप अन् स्मॉल कॅप निर्देशांक देखील घसरले. निफ्टी मिडकॅप 1.3 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये 1.1 टक्के घसरण पाहायला मिळाली.बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील कंपन्यांचं बाजारमूल्य 2.6 लाख कोटींनी घसरुन 402 लाख कोटी रुपये झालं.
बाजारात अस्थिरता का प्रमुख कारणं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको, चीनवर आयात शुल्क लादणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनतरी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक घोषणा केली. ट्रम्प यांनी वाहन, सेमीकंडक्टर आणि औषधांच्या आयातींवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. याची अंमलबजावणी 2 एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. यामुळं भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर भारतातील औषध कंपन्यांकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या औषधांवर परिनाम होऊ शकतो. या शंकेमुळ निफ्टी फार्मा आणि निफ्टी हेल्थकेअर निर्देशाकांक 2-2 टक्के घसरला आहे.
ऑक्टोबर 2024 पासून बाजारावर दबाव दिसत आहे. सप्टेंबर ते डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल कमजोर दिसून आलं. मागणीतील घट अन् रुपया कमजोर होत असल्यानं बाजारात घसरण सुरु आहे. चीननं त्यांच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी घेतलेले निर्णय अन् अमेरिकेच्या आर्थिक धोरणातील बदलामुळं विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री केली जात आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून समभागांची विक्री
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी 3450 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून 1 लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 6.1 टक्के घसरण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली. बँक आणि वाहनांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 2304 शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तर, 1652 शेअरमध्ये तेजी दिसून आली.