मुंबईत आढळला गिया बार्रेचा पहिला रुग्ण? अंधेरीतील तरुणामध्ये लक्षणं, रुग्णालयात दाखल

मुंबईत गिया बार्रेचा पहिला रुग्ण आढळला आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे समोर आलं आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु अद्याप बीएमसीकडून अधिकृतरित्या ही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. तसंच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.