देश

कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यास विरोध, वर्षा गायकवाडांचा ठिय्या, पोलिस-आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

धारावी पुनर्वसनला काँग्रेस सुरूवातीपासूनच विरोध करताना दिसतंय. धारावीचे काही नागरिकही या पुनर्वसनाच्या विरोधात आहेत. आता कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यास जोरदार विरोध होताना दिसतोय. धारावीचा पुनर्वसन प्रकल्प हा गाैतम अदानीला देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी हे धारावी पुनर्वसनाबद्दल बोलताना दिसले. एअरपोर्टचे काम अदानीला, धारावी पुनर्वसनचे कामही अदानीला म्हणत त्यांनी मोदींवर टीकाही केली होती. पूर्ण जमिनी अदानीला देण्याचे काम देशभरात सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. आता काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळतंय.

कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यास विरोध

कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. वर्षा गायकवाड या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. हेच नाहीतर यादरम्यान वर्षा गायकवाड यांच्या पायाला दुखापत झालीये.

वर्षा गायकवाड यांनी ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. पोलिसांनी हा मोर्चा रस्त्यात रोखला. यानंतर वर्षा गायकवाड आणि आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या सुरू केले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठा झटापट देखील झाली. यामुळे आता वाहतूक ठप्प झाल्याचेही बघायला मिळतंय. जोपर्यंत पुढे जाऊ दिले जाणार नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेण्यात आलीये.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड या म्हणाल्या की, कुर्ला डेअरी ही कुर्लात आहे, ती शासकिय जमीन आहे. ती जमीन लोकांना मिळावी. ही जमीन कुर्लाकरांची आहे. त्याठिकाणी 150 वर्षांपासूनची झाडे आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू आहे. आमचे एकच म्हणणे आहे की, त्याठिकाणी गार्डन बनवा. लोकांच्या जागा अदानीला देऊन हे सरकार अदानीसाठी काम करतंय, असाही मोठा आरोप हा वर्षा गायकवाड यांनी सरकारवर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button