व्यापार

ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, चांदीही महागली, वाचा आजचे दर

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरक्षित गुंतवणुक म्हणून ओळखलं जाणारा मौल्यवान धातु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दर तेजीत आहेत. तर, घरगुती वायदे बाजारातदेखील सोन्याचे दर उसळले आहेत. सोनं 11व्या आठवड्यात उच्चांकावर नोंदवले गेले आहे. MCX वर सोन्याचे 79,400 रुपयांवर आहेत. तर, वर्षातील आजवर 3 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आली आहे.

सोन्याच्या दरांबाबत ट्रम्पची आर्थिक पॉलिसी आणि कमजोर डॉलर इंडेक्स हा महत्त्वाचा हिस्सा आहे. आर्थिक पॉलिसीत असलेल्या अनिश्चिततेमुळं सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीत वाढ होत आहे. डॉलर इंडेक्स 108 जवळ आहे तर आठवड्याभरात 1 टक्क्यांची घट आली आहे. ट्रम्पची पॉलिसी आणि कमजोर डॉलरचे दर वाढल्याने पुढील महिन्यात चीनच्या वस्तुंवर 10 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकतात. पुढील 28-29 जानेवारी रोजी फेडची पॉलिसी बैठक होणार असून ज्यात व्याज दरांमध्ये कपात होण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हणणं आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 860 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 82.090 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली असल्यामुळं प्रतितोळा सोनं 75,250 रुपयांवर स्थिरावली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 570 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 61,570 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 75, 250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 82, 090 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 61,570 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,525 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,209 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6, 157 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 60,200रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 65,672रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 49,256 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 75, 250 रुपये
24 कॅरेट- 82, 090 रुपये
18 कॅरेट- 61,570 रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button