देश

संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल

विधानसभेला या तिन्ही पक्षाला जनतेने नाकारलं आहे. ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू त्याची आम्हाला चिंता नसल्याचे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. राज्यामध्ये जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते शिर्डीत बोलत होते.

शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. अधिवेशन स्थळाचा आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला महाविजय मिळवायचा आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने रणशिंग फुंकल जाणार असल्याचे विखे म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली होती
मी मागेच म्हणालो होतो महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही. महाविकास आघाडीचे लोक भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत. महाविकास आघाडीची सत्तेत येण्याची धडपड होती असा टोला विखे पाटलांनी लगावला. कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवल्याचे विखे पाटील म्हणाले. सत्ता गेल्याबरोबर महाविकास आघाडीतील मतभेद समोर यायला सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेस उबाठाबद्दल बोलतंय उबाठा राष्ट्रवादी बद्दल चर्चा करतय, असे म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी सत्तेच्या लालसापाई सत्ता स्थापन केली होती. निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून त्यांनी विजय संपादन केला होता. मात्र, ते नेरेटिव्ह विधानसभेला चाललं नाही असंही विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे घरी बसलेत, काँग्रेस पक्षाची दुरावस्था मी सांगण्याचं कारण नाही असेह विखे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडी राहील अशी स्थिती नाही असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांचं संतुलन बिघडलंय
संजय राऊत यांना फक्त मुद्दा पाहिजे असतो. त्यांनी स्वतःचं अस्तित्व गमावलं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही विखे पाटील म्हणाले. संजय राऊत यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. राऊत यांचं संतुलन बिघडल्याचे विखे म्हणाले. आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार का? याबाबत देखील विचारण्यात आलं. यावेळी विखे पाटील म्हणाले, तो अधिकार माझा नाही. महायुतीमध्ये सोबत असणारे सगळ्या घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते याबाबत निर्णय करतील असे विखे पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button