देश

सोन्याचे दर घसरले, ऐन लग्नसराईत ग्राहकांना दिलासा; वाचा 24 कॅरेटचे दर

सोनं-चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. मागील आठवड्यात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि वायदे बाजारासोबतच सराफा बाजारातही सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. आज सोमवारी 16 डिसेंबर रोजी वायदे बाजारात दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत घट झाल्याचे समोर आले आहे.

मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 102 रुपयांनी घसरून 77,034 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले आहे. शुक्रवारी 77,136 रुपयांवर व्यवहार बंद झाला आहे. चांदी या दरम्यान 68 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं चांदी 90,933 रुपयांवर स्थिरावली आहे. तर, मागील सत्रात चांदी 91,001 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोनं शुक्रवारी 35 डॉलरने घसरले तर चांदी 31 डॉलरच्या जवळपास स्थिरावली आहे.

आज 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 1,400 रुपयांनी घसरून 79,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली होती. 99.5 टक्के शुद्धता असलेले सोन्याचा दरदेखील 1,400 रुपयांनी कमी होऊन 79,100 रुपयांवर स्थिरावला आहे. मागील सत्रात याचा दर 80,500 रुपये प्रति तोळा होता.

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,890 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,420 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,140 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,789 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 842 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62, 312 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,736 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-71,400 रुपये
24 कॅरेट 77,890 रुपये
18 कॅरेट- 58,420 रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button