हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन

हिंगणे येथील व्यायामशाळेत व्यायाम करताना कुस्तीपटू विक्रम पारीख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. ४ नोव्हेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. विक्रम पारीख वयाच्या फक्त 30व्य वर्षी आपले प्राण गमावले आहेत. घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नक्की काय झालं?
वृत्तानुसार, विक्रम पारीख जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी तातडीने बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांला मृत घोषित करण्यात आले.
कोण आहे विक्रम पारीख?
मुळशी तालुक्यातील माने गावचा विक्रम पारीख आहे. तो एक प्रसिद्ध कुस्तीपटू होता. त्याला हिंदकेसरी अमोल बुचडे यांनी प्रशिक्षण दिले होते. विक्रमने कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक मोठी पदके जिंकली होती. विक्रमने अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि रांची, झारखंड येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य पदकासह पदके जिंकली होती. 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेतही तो सहभागी होणार होता.
काहीच दिवसात होणार होते लग्न
अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विक्रमचे लग्न 12 डिसेंबर रोजी होणार होते. परंतु त्या आधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. नशिबाने त्याच्यासाठी इतर योजना आखल्या होत्या. त्यांच्या मागे आता त्याचे वडील शिवाजीराव पारीख, निवृत्त लष्करी कर्मचारी, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. विक्रमच्या सहा अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब दु:खात आहे.
विक्रमच्या अकाली निधनाने कुस्ती समुदायाला धक्का बसला आहे आणि तो एक प्रतिभावान आणि समर्पित कुस्तीपटू म्हणून स्मरणात राहील असे सगळेच म्हणत आहेत.