देश

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी

मतदान तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून, इतर नेतेही आता वादळी सभांना सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. यादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीकडे बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान होतं. ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यातच आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. यादरम्यान अर्ज कोणी माघार घेतले आहेत त्यांची नावं जाणून घ्या.

अर्ज मागे घेणाऱ्यांची संपूर्ण यादी
मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा

गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली

स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व

सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद

मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद

विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा

किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर

जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड

जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर

अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर

अमित घोडा- भाजप, पालघर

तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व

तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली

मदन भरगड- काँग्रेस, अकोला

प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर

सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा

विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार

सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर

जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला

नाना काटे- अजित पवार, चिंचवड

बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी

मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा

विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर

संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ

हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य

उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी

अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य

राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी

कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला

जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला

किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर

रुपेश म्हात्रे- शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-भिवंडी पूर्व

संगीता वाझे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-मुलुंड

मिलिंद कांबळे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-कुर्ला

अविनाश लाड-काँग्रेस-रत्नागिरी

प्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदा

दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर

अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर

संगिता ठोंबरे- भाजप, केज

राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड

अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा

धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी

शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगली

रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा

नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल

सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल

राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल

वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल

संदीप सरोदे- भाजप- कोटोल

उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतले?
1) अंधेरी पश्चिम येथून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशोक जाधव यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे. माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अशोक जाधव यांना दिलासा मिळाला आहे.

2) औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत.

3) पालघर विधानसभेतील बंडखोरी मोडीत काढण्यात देखील महायुतीला यश आलं आहे. भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमित घोडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पालघर विधानसभेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करून अमित घोडा मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते.

4) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. बीड विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळेस निवडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जय दत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन पुतणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून पुतणे योगेश क्षीरसागर, तर दुसरे पुतणे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट संदीप क्षीरसागर आहेत.

5) तुळजापूरमधील काँग्रेसचे बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुळजापूर मधून उमेदवारी न मिळाले बंडाचा झेंडा फडकत मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईनंतर मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतली. काँग्रेसचे धीरज पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचे राणा जगजीत सिंह पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यातील लढत निश्चित आहे.

6) शिवसेनेने देवळाली मतदारसंघात दिलेला एबी फॉर्म मागे घेतला. देवळाली मतदारसंघातील उमेदवार राज्यश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राजश्री अहिराव कालपासून नॉट रिचेबल होत्या.

शिवसेनेने आदेश देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पक्षांतर्गत बैठक होऊन निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी रद्द करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या. देवळालीप्रमाणे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही धनराज महाले यांचीही अधिकृत उमेदवारी पक्षाकडून रद्द करण्यात आली.

7) तुमसर येथून मधुकर कुकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

8) अकोला पश्चिम मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झिशान हुसैन यांनी माघार घेतली. झिशान हुसैन यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचित मध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीने झिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती. झिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अझर हुसैन यांचे सुपुत्र आहेत.

9) रायगड – अलिबागमधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

10) सांगली – मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर सी आर सांगलीकर,मोहन व्हनखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब व्हनमोरे या तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

11) नाशिकमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अपक्ष बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनी आपला उमेदवारी घेतली मागे घेतला.

12) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची माघार, माधुरीमा राजे यांनी अर्ज मागे घेतला.

13) दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे धनराज महाले यांनी घेतली आपली उमेदवारी मागे, वेळेवर एबी फॉर्म घेऊन नरहरी शिरवळ यांना दिले होते आव्हान

14) नाशिक पश्चिममधून कामगार नेते माकपचे डॉ. डी. एल कराड यांची माघार. संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतली माघार.

15) चोपडा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंडखोर उमेदवार माजी आमदार जगदीश वळवी यांची माघार

मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता असून शरद पवारांसोबत पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याने मी माघार घेत असल्याची जगदीश वळवी यांची माहिती

16) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजप श्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉ. होळी नरमले, डॉ. होळी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा मार्ग झाला सुकर

17) भाजपाचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी घेतली माघार.

भाजपाने उमेदवारी दिली नाही,,म्हणून शिवाजी डोंगरे यांनी दाखल केली होती उमेदवारी.

18) नाशिक मध्यचे उमेदवार अजित पवार गटाचे बंडखोर शहराध्यक्ष अपक्ष रंजन ठाकरे यांनी घेतली माघार

19) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे रणजीत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शेवटची पाच मिनिटं बाकी असताना फॉर्म मागे घेतला. शरद पवार यांच्या शिष्टाईला यश. शरद पवार यांनी रंजीत पाटील यांना फोन केला होता.

20) बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनीही माघार घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button