देश

Kane Williamson: मी असमर्थ आहे, म्हणत विलियम्सनने सोडलं कर्णधारपद; बोर्डाची ऑफरही नाकारली

यंदाचा टी-20 वर्ल्डकप न्यूझीलंडच्या टीमसाठी काही फारसा चांगला गेला नाही. सुपर 8 मध्येही प्रवेश मिळवता न आल्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडची टीम सुपर 8 मध्येही स्थान निश्चित करू शकली नाही. किवींना लीग स्टेजमध्ये सामन्यात अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर आता केन विलियम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे.

टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं की, न्यूझीलंडच्या टीमने लीग स्टेजच्या पुढच्या टप्प्यात मजल मारली नाही. अशातच ही परिस्थितीत लक्षात घेऊन कर्णधार विलियम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये त्याने टेस्ट क्रिकेटसह परदेशी फ्रँचायझी लीगमध्ये खेळता यावं यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसोबत कर्णधारपदही सोडलं
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्यासोबतच केन विल्यमसनने मर्यादित ओव्हर्सच्या म्हणजेच व्हाईट बॉलच्या फॉरमॅटमधील टीमचं कर्णधारपदही सोडलं आहे. राष्ट्रीय टीम आणि देशांतर्गत सुपर स्मॅशच्या सामन्यांसाठी किवी टीमच्या राष्ट्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले खेळाडू उपलब्ध असणं गरजेचं आहे.

या निर्णयाबाबत केन विलियम्सन म्हणाला की, टीमला सर्व फॉरमॅटमध्ये पुढे नेताना मला आनंद झाला. मी भविष्यातही योगदान देत राहणार आहे. मी केंद्रीय करार स्वीकारण्यास असमर्थ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि टीमसाठी खेळणे माझ्यासाठी अजूनही महत्त्वाचं आहे. मात्र, क्रिकेटबाहेरील माझे जीवन खूप बदललं आहे. मला आता माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.

यापूर्वी टेस्ट टीमचं कर्णधारपद सोडलं होतं
केन विल्यमसनने आधीच टेस्ट क्रिकेटमधील न्यूझीलंड टीमचं कर्णधारपद सोडलं होतं. तर त्याने मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेट कर्णधारपदही सोडलं आहे. केन विलियम्सनने 91 वनडे सामने आणि 75 टी-20 सामन्यांमध्ये किवी टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती. या कालावधीत किवी संघाने 47 वनडे सामने आणि 39 टी-20 सामने जिंकलेत. केन विल्यमसनशिवाय न्यूझीलंड टीमचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसननेही स्वत:ला सेंट्रल करारातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button