देश

मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

परळ एसटी डेपोजवळ एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एसटी कंडक्टर महेश लोले (Mahesh Lole) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही हे अस्पष्ट झालेले नाही. महेश लोले कागल डेपोमध्ये कार्यरत होते.

दरम्यान, राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या चार महिन्यापासून सुरु आहे. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) चिघळले. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घराबाहेर हल्ला (Silver Oak Attack) केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button