देश

सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होत आहे. त्यापूर्वी लोकसभेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोल जाहिर होताच आज सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 72,110 रुपये इतका आहे. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. मागील दोन आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोनं 75 हजारांच्या पार गेले होते. मात्र नंतरच्या काही दिवसांतच सोन्याचे भाव गडगडले आहेत. आता लग्नसराईचा दिवसही नसल्याने सोन्याच्या मागणीत थोडी घट होऊ शकते. गुडरिटर्ननुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचे दर 6,610 इतके आहेत. तर, 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचे दर 7,211 इतके आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. कॉमेक्सवर सोन्याचा वायदे भाव 0.17 टक्के म्हणजेच 4.00 डॉलरने घसरले आहेत. 2,341.80 डॉलर प्रति औंसवर आहे. सोन्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव 2,321.43 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. चांदीच्या भावातही तेजी आली आहे. कॉमेक्सवर चांदीचा वायदा 0.30 टक्के किंवा 0.09 डॉलरने घसरला असून 30.35 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. चांदीचा वैश्विक हाजिर भाव 30.22 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66, 100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72, 110 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 080 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,610 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,211 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 408 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 52,880 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 57,688 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,264 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 66, 100 रुपये
24 कॅरेट- 72, 110 रुपये
18 कॅरेट- 54, 080 रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button