देश

‘ओरु अदार लव’ दिग्दर्शकावरच अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप, अटकेची शक्यता

मल्याळम चित्रपटांमधील लोकप्रिय दिग्दर्शक ओमर लुलु विरोधात एका महिलेनं बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही महिला एक तरुण अभिनेत्री आहे. या महिलेनं केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओरु अदार लव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमर लुलुनं केलं होतं. त्याच्या या चित्रपटात प्रिया प्रकाश वॉरियरनं डोळे फिरवण्याचा सीन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

‘पीटीआय’ या न्यूज एजन्सीनं दिलेल्या मुलाखतीत, एनॉकुलम ग्रामीण पोलिसच्या एका अधिकाऱ्यानं मंगळवारी या विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की महिलेच्या तक्रारिच्या आधारावर प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणात चौकशी करत आहेत. आरोप करणाऱ्या महिलनं स्वत: ला अभिनेत्री म्हटलं आहे. पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की महिलेची ही तक्रार कोच्ची शहराच्या पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली आहे. प्राथमिक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांतर्गत नेदुम्बसेरी पोलिस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. कारण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे.

पोलिसांनी पुढे सांगितलं की ओमर लुलुवर भारतीय दंड संहिता कलम 376 अंतर्गत आरोप करण्यात आले होते. खरंतर या प्रकरणात अधिक माहिती मिळालेली नाही. पण या प्रकरणात जास्त माहिती मिळालेली नाही. पण अशी शक्यता आहे की सुरुवातीला केलेल्या चौकशी दरम्यान, पोलिसांना काही पुरावे मिळाले तर ओमर लुलुचा अटक करण्यात येऊ शकते.

ओमर लुलुचं खरं नाव ओमर अब्दुल वाहब आहे. ओमर लुलु हा 39 वर्षांचा आहे. त्यानं 2016 मध्ये हॅपी वेडिंग या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत एक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटानं केरळ बॉक्स ऑफिसवर 100 दिवस स्वत: ला टिकवून ठेवलं होतं आणि त्यावेळी त्या चित्रपटानं 13.70 कोटींची कमाई केली. त्यावर्षाचा बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा एक चित्रपट होता. तर 2017 मध्ये त्याचा ‘चंक्‍ज’ बनवला होता. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. त्यानंतर 2019 मध्ये ओरू ओदार लव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात प्रिया प्रकाश वॉरियर होती. त्यानंतर ती इंटरनेट सेंसेशन ठरली होती.

ओमर लुलुनं गेल्या वर्षी मल्याळम टिव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 5’ मध्ये भाग घेतला होता. या शोचे सुत्रसंचालन सुपरस्टार मोहनलाल होस्ट करत होते. ओमर याआधी 2022 मध्ये वादात अडकली होते जेव्हा केरळ एक्साइज डिपार्टमेंटनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. हे तक्रार त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘नल्‍ला समयम’ या चित्रपटामुळे झाली होती. त्याच्यावर आरोप होते की MDMA सारखे ड्रग्स त्या चित्रपटात प्रमोट करण्यात आले. त्याशिवाय चित्रपटात मद्यपानाला प्रमोट केल्याचे देखील त्याच्यावर आरोप लावण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button