अपराध समाचार

झुडूपात महिलेचा मृतदेह, चांदीचे दागिने अन् हातावर गोंदण; ७ दिवसांनी हत्याकांडाची उकल

उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोड लगत दोन दिवसापूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे.

गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोड लगतच्या झुडपामध्ये एका अज्ञात महिलेचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेची हत्या केल्याचे आढळून आल्यानंतर उरण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी पोलिसांनी मृत महिलेचे फोटो व्हॉटस्अॅपवरवरून प्रसारित केले. यादरम्यान मानखुर्द पोलीस ठाणे येथे एक महिला मिसींग दाखल असल्याची माहिती मिळाली.

नतर उरण पोलिसांनी मिसींग महिलेच्या नातेवाईकांना उरण येथे बोलावून घेऊन त्यांना चिरनेर येथे सापडलेल्या महिलेचा मृतदेह दाखविला. मृत महिलेच्या अंगावरील कपडे, चांदीचे दागिने आणि इतर वस्तू तसेच हातावर गोंदलेले नाव यावरून सदरची महिला ही पुनम चंद्रकांत क्षीरसागर (२७) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुनम बाबत माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पुनमचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. तसेच १८ एप्रिल रोजी पुनम कामावर गेली असताना तीला टॅक्सी चालक निजामुद्दीन अली हा घेऊन गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे मृत पुनमबाबत चौकशी केली. त्याने पुनमची हत्या करून तिचा मृतदेह चिरनेर येथे टाकून दिल्याचे कबूल केले. त्यानुसार २७ एप्रिल रोजी आरोपी निजामुद्दीन अली याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली

त्यानंतर पोलिसांनी निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे मृत पुनमबाबत चौकशी केली. त्याने पुनमची हत्या करून तिचा मृतदेह चिरनेर येथे टाकून दिल्याचे कबूल केले. त्यानुसार २७ एप्रिल रोजी आरोपी निजामुद्दीन अली याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. न्यायालयाने त्याला २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिल्याचे देखील निकम यांनी सांगितले

या घटनेतील मृत पुनमचे इतरांसोबत संबंध असल्याची माहिती निजामुद्दीन अली याला मिळाली होती. त्यामुळे त्याने पुनमला १८ एप्रिल रोजी फिरायला नेण्याच्या बहाण्याने टॅक्सीमधून कल्याण खडवली येथे नेले होते. त्याठिकाणी निजामुद्दीन अली याने पुनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह त्याने उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पलायन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button