
लोकसभा निवडणुकीसाठीचा पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीला अधिक रंग चढू लागला आहे. आज महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि रो शो होणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अकोल्यातील सभेचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभा आज होणार आहेत.