देश

अद्वितीय शौर्य दाखवणाऱ्या Abhinandan Varthaman यांना ‘वीर चक्र’ प्रदान

पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला क्षती पोहोचवणारे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोमवारी नवी दिल्ली येथे वीर चक्र या बहुमानाने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पाकिस्तानमध्ये भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शेजारी राष्ट्राचं एफ 16 या विमानावर हल्ला केला होता.

वर्धमान यांनी दाखवलेल्या या कर्तबगारीप्रती त्यांचा सोमवारी राष्ट्रपतीभवन येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

भारताचं नाव, जागतिक पटलावर….
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं वारंवार आपल्या साहसाची प्रचिती दिली होती.

एअरस्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानच्या सैन्याकडू भारतात घुसखोरी करण्याचा प्रय्नत केला गेला.

भारतीय वायुदलाने ही घुसखोरी आणि हा प्रयत्न उलथून पाडला. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन MIG 21 उडवत होते.

अटीतटीच्या त्याच क्षणी अभिनंदन यांनी पासिक्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानावर निशाणा साधला होता. पण, यानंतर खुद्द वर्धमान यांचंही विमान क्रॅश झालं.

पाकिस्तानी हद्दीतच विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे पाकिस्तानं सैन्यानं वर्धमान यांना बंधक केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button