देश

Maharashtra Rain : राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पावसाचं पुनरागमन, पण कधी? पाहून घ्या

सप्टेंबरची चांगली सुरुवात करणाऱ्या पावसानं अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला आणि सर्वांच्याच चिंतेत भर पडली. ऐन पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळं ऋतुचक्रच गडबडल्याची बाब सर्वांच्या लक्षात आली. असं असतानाच यंदा हा पाऊस रडवणार वाटतं… ही शक्यता गडद होत असतानाच पाऊस परतला. तो आला, चिंब बरसला आणि पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला. असा हा पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात जोर धरताना दिसणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात शुक्रवार, 15 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात होणार आहे. राज्याचा बहुतांश भाग हा पाऊस व्यापणार असून त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा जोर जास्त असेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. दरम्यानच्या काळात कोल्हापूर, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मुंबईसह नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक सरीची बरसात पाहायला मिळेल. कोकणात एकिकडे गणेशोत्सवाची लगबग सुरु झालेली असतानाच दुसरीकडे पाऊसही जोर धरणार आहे. त्यामुळं पावसासाठीची व्यवस्था करूनच पुढच्या कामांची आखणी केलेली उत्तम.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button