देश

Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटांना अखरेचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत प्रचंड जनसमुदाय दाखल

ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.

रतन टाटा यांना मानवंदना देण्यासाठी आलेले VIP गेल्यावर तेथे प्रचंड जनसमुदाय दाखल झाला. त्यामुळे स्मशानभूमीत गर्दी झाली. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता टाटांचे नातलग आणि जवळच्या मित्र परिवारातील लोक यायला सुरुवात झाली असून कम्युनिटी हॉलमध्ये सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button