देश

Pune CBI Raid: अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर CBI ची छापेमारी; 8 लाख रुपये स्वीकारताना CBI ने गाठलं

पुण्यात महसूल विभागात एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने धाड टाकली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना 8 लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. रामोड हे आयएएस अधिकारी असून महसूल विभागात ते उपयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे.

सविस्तर बातमी थोड्यावेळात…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button