Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, ‘या’ राज्यातील नागरिकांना अलर्ट
बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. मात्र, या वादळाचा धोका असल्याने भारतीय हवामान खात्याने इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढील 36 तास अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.
या राज्यांना बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका
Biporjoy चक्रीवादळ देशाच्या पश्चिम भागातील किनारपट्टीवरील राज्यांना धोका पोहोचवू शकण्याची अधिक शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका किनारपट्टीला आहे. IMD नुसार, चक्रीवादळ बिपरजॉय येत्या 36 तासांत तीव्र स्वरूप धारण करु शकते. ते अधिक तीव्र होऊ शकते. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव गुजरात, सौराष्ट्र, उत्तर केरळ, कर्नाटक आणि गोव्यातही दिसून येईल. हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ बिपरजॉय उत्तरेकडून वायव्येकडे पुढे सरकत आहे. Cyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी
बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकतेय
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले असून ते गुजरातच्या किनारपट्टीच्या पोरबंदर जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्येकडे सुमारे 870 किमी अंतरावर स्थिरावले आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रातून किनारपट्टीवर परतण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बंदरांवर रिमोट वॉर्निंग सिग्नल जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, ‘अल निनो’ सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका
हवामान विभागाकडून अलर्ट जारी
बिपरजॉय चक्रीवादळाने अरबी समुद्रात उधाण पाहायला मिळत आहे. या वर्षीच्या पहिल्या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारी भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. अहमदाबादमधील हवामान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे 10, 11 आणि 12 जून रोजी वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 मैलांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला. या वादळाच्यावेळी वाऱ्याचा वेग 65 नॉट्सपर्यंत पोहोचू शकतो. Maharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका, बचाव कार्यासाठी टीम सज्ज
बिपरजॉय चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्व बंदरांना रिमोट वॉर्निंग सिग्नल जारी करण्यास सांगितले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, NDRF च्या 15 टीम आणि SDRF च्या 11 टीम्स गुजरातमध्ये बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.