देश

HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. ( HSC Maths Paper Leaked ) बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (HSC Exam News ) याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

बारावीचे पेपर नक्की कोणी काढले?, इंग्रजी पेपरनंतर हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत ‘ही’ चूक

12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला…? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे…? यामागे रॅकेट सक्रिय आहे का…? याचा तपास केला जात आहे. मात्र, इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार नुकताच निस्तरल्यावर आता गणिताच्या पेपरचा नवा गोंधळ होण्याची चिन्हं आहेत. याबाबत बोर्डाच्या सूत्रांकडून अद्याप पेपर फुटल्याचा दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फुटला होता.

याआधी यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर
बारावीची परीक्षा सुरु आहे. (HSC Exam) मात्र, याआधी इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. (Maharashtra HSC Exams 2023 ) हा गोंधळ कमी की काय? आणखी एक बातमी समोर आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला होता. हा पेपर फुटल्याने परीक्षाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. हा गोंधळ असताना आता गणिताचा पेपर फुटल्याने प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे धक्कादायकबाब म्हणजे बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button