देश

IMD Weather Updates : उकाडा वाढला! पारा 44 अंशांच्या पुढे, ‘या’ भागात उष्णतेची लाट

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण राज्याला हादवणारी बातमी समोर आली. उष्माघाताच्या त्रासामुळे 11 जणांचा नाहक बळी गेला. तर 100 लोकांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असताना हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी राज्यात वाढत असलेले तापमान आणि उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (17 एप्रिल 2023) संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button