देश

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागलं; झटपट चेक करा तुमच्या शहरातील इंधन दर

आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) घसरणीनंतरही अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी इंधन दर जारी केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवले जातात. दरम्यान, आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. WTI क्रूड ऑइल (WTI Crude Oil) आज एक टक्क्यांनी घसरले असून आज WTI क्रूड ऑइल दर 69.26 डॉलरवर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूड तेल (Brent Crude Oil) 1.21 टक्क्यांनी घसरलं असून प्रति बॅरल 74.99 डॉलरवर व्यापार करत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही आज इंधन दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये दरवाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्रात दर स्थिर आहेत. देशात मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. कच्च्या तेलाच्या दरांवरील चढ-उताराचा इंधन दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel Price : महानगरांमधील इंधनाचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
‘या’ शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले
दिल्लीपासून नोएडापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. नोएडामध्ये पेट्रोल 27 पैशांनी आणि डिझेल 26 पैशांनी महागलं असून ते 96.92 रुपये आणि 90.08 रुपयांना मिळत आहे. तसेच, गुरुग्राममध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 10 पैशांनी महागलं असून 96.94 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लीटर आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये आज पेट्रोल 1.23 रुपयांनी महागलं असून 101.07 रुपये आणि डिझेल 1.22 रुपयांनी महागलं असून ते 95.87 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 13 पैसे प्रति लिटर 96.43 रुपये आणि 89.63 रुपये दराने विक्री होत आहे.

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
पुणे : पेट्रोल 105.95 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 107.40 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 107.17 रुपये, डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button