देश

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर – संदीप देशपांडे

माझ्यावर हल्ला करुन काहीही उपयोग होणार नाही. जर त्यांनी माझ्यावर हल्ला करण्यापेक्षा माझे तोंड फोडले असते तर मी गप्प झालो असतो. राजकारणचा चिखल झाला आहे, ते आता दिसत आहे. मी भ्रष्टाचार समोर आणला. म्हणून माझे तोंड गप्प करायचे आहे. पण मी काही गप्प बसणार नाही. आता त्यांचा उद्देश सफल होणार नाही. माझ्यावर हल्लामागील भांडूप कनेक्शन आता समोर आले आहे. पोलीस तपास करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यांनी सुरक्षेसाठी 2 पोलीस पाठवले आहेत. या हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही. मला सुरक्षेची गरज नाही ती परत घ्यावी, अशी माहिती हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांनी दिली आहे.

संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र सैनिक, सर्व पक्ष्यांच्या नेत्यांचे आभार आहेत. सर्वानी चौकशी केली. परंतु उद्धव ठाकरे गटापैकी कोणाचे फोन आले नाहीत. ते मला ओळखत नाहीत, असं वाटते. मी काल सकाळी फिरायला गेलो होतो. एकाने माल मारलं मग मागे वळून पाहिलं अजून वार करण्याचा प्रयत्न केला मी ओरडलो. त्यानंतर लोक जमा झाले ते पळून गेले. पोलीस तपास करत आहे मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. माझा जवाब मी पोलिसांना दिला आहे. आरोपी पकडले जातील तेव्हा मी बोलेल. माझं म्हणणं मी सविस्तर मंडल आहे. आरोपींची अटक होऊन चौकशी झाल्यावर मी बोलेन, आता चौकशी सुरु असल्याने काही बोलणार नाही, असे देशमांडे म्हणाले.

राजकारणचा चिखल झाला आहे, ते आता दिसत आहे. मी भ्रष्टाचार समोर आणला. म्हणून माझे तोंड गप्प करायचे आहे. पण मी काही गप्प बसणार नाही. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. त्यांनी माझ्यावर कोणी हल्ला करायला सांगितले ते समोर आले पाहिजे. ठाकरे गटाने आतापर्यंत लोकांना वापरुन घेतले आहे, असा आरोप देशपांडे यांनी यावेळी केला.

कोरोना भ्रष्टाचारमध्ये कोणती विरप्पान गॅंग आहे हे मला माहीत आहे. पुढील दोन दिवसात अजून एक घोटाळा काढणार होतो. याची त्यांना कुणकुण लागली आहे. त्यामुळे हा हल्ला झाला असेल. पालिकेतील घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. कॅगमार्फत झाली पाहिजे किंवा आर्थिक गुन्हे शाखे मार्फत झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. एका कंपनीला कंत्राट दिले ज्याचं टर्न ओव्हर 10 लक्ष रुपये होता. याची चौकशी करावी यासाठी पालिका आयुक्तांनाकडे मागणी केली होती. फर्निचर घोटाळा, बेडशीट घोटाळा झालाय. ज्याला काम मिळाले आहे त्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांच्याबरोबर फोटो आहेत, असा त्यांनी आरोप केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. त्यांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे. त्यामुळे ते असं बोलत आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांच्या विरुद्ध गेला तर ते न्यायालयाच्या विरोधातही बोलतील. त्यांना शिव्या देतील, असे देशपांडे म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी त्यांची सुरक्षा काढावी मग शीवसेना भवन समोर त्यांना फटके देऊ, असे धक्कादायक विधान अमेय खोपकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button