देश

IndiGo Flight : फ्लाईटमधील प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली, दोहाला जाणारं विमान कराचीला वळवलं, इमर्जंन्सी लँडिग करण्याआधीच…

इंडिगो कंपनीच्या (IndiGo Flight) दोहाला (Doha) जाणाऱ्या विमानाचं कराचीमध्ये (Karachi) इमर्जंन्सी लँडिग (Emergency Landing) करण्यात आलं. विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने (Medical Emergency) दोहाला जाणारं हे विमान कराचीला वळवण्यात आलं. मात्र, प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एअरलाईन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इमर्जंन्सी लँडिगनंतर मेडिकल टीमने प्रवाशाची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित केलं. सुत्रांच्या माहितीनुसार, हा प्रवासी नायजेरियाचा नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे.

विमानातील प्रवाशाचा मृत्यू
इंडिगो कंपनीने याबाबत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, नवी दिल्लीहून दोहाला जाणारं इंडिगो एअरलाईन्सचे विमान 6E-1736 हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची शहरात वळवण्यात आलं. प्रवाशाची तब्येत बिघडल्याने विमान कराचीला वळवल इमर्जंन्सी लँडिग करण्यात आलं. दरम्यान, फ्लाईट लँड होताच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने आजारी प्रवाशाची तपासणी करत प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

कंपनीने प्रवाशाचा कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. “आम्ही या बातमीने खूप दुःखी झालो आहोत आणि आमच्या संवेदना त्याच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत. आम्ही सध्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत आणि फ्लाईटमधील इतर प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करत आहोत,” असे इंडिगोनं निवेदनात म्हटलं आहे.

मृत प्रवासी नायजेरियन नागरिक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशाची अचानक तब्येत बिघडल्याने प्रवाशाला वाचवण्यासाठी हे लँडिंग करण्यात आलं. कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाला मृत घोषित केलं. त्यानंतर इंडिगो फ्लाईटने मृत प्रवाशासह दिल्लीला परत उड्डाण केलं. हा प्रवासी नायजेरियन नागरिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button