देश

ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्या घरावर आज पुन्हा छापे पडलेत. (ED Raid ) हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी राडा सुरू केलाय. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. एका कार्यकर्त्याने ठिय्या आंदोलनादरम्यान आपलं डोकं आपटून घेतले. मुश्रिफांच्या घराबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. ईडी अधिकाऱ्यांनी तातडीने परत जावे तसेच भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. ( ED Raids Hasan Mushrif House ) ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. 10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक आलं आहे. मुश्रीफ यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. (Political News) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एका कार्यकर्त्यांनी स्वत:चे डोके फोडून घेतले. यावेळी समर्थकांनी जोरदार राडा घातला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

मुश्रीफ यांच्या घरी दूध देण्यासाठी एक व्यक्ती आला होता. यावेळी या दूध देणाऱ्या व्यक्तीला CRF च्या जवानांनी विरोध केल्याने तणाव झाला. त्याचवेळी स्थानिक पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की सुरु झाली. त्यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button