देश

शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा Coronavirus) संसर्ग वाढतच आहे. यादरम्यान, कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रात्री शिवसेना नगरसेविका सौ. सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ( Shiv Sena corporator Satyabhama Gadekar passed away at Nashik)

सत्यभामा गाडेकर प्रभाग क्रमांक 22 ब च्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका होत्या. शिवसेना पक्ष्याच्या सक्रिय सदस्य सदस्यांपैकी एक अशी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांची ओळख होती. कोरोनावर उपचार सुरु असताना नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.

सत्यभामा गाडेकर यांच्या निधनाने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, 11 एप्रिल रोजी शिवसेनेच्याच नगरसेविका कल्पना पांडे यांचे देखील निधन कोरोनाने झाले होते. गाडेकर यांच्या निधनानंतर शिवसेनेसाठी आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button