Maharashtra Political Crisis LIVE Updates : ठाकरे vs शिंदे आजपासून पुढचे तीन दिवस सलग सुनावणी
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) सुनावणी होणार आहे.(Shiv Sena) शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. (Thackeray vs Shinde Updates ) ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे, वकील नीरज किशन कौल, वकील मनिंदर सिंग शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. शिवाय वकील महेश जेठमलानीही शिंदे गटाकडून असतील. (Maharashtra Political Crisis News) तर राज्यपालांकडून महाधिवक्ते तुषार मेहता युक्तिवाद करणार आहेत. (Maharashtra Politics case) मागच्या सुनावणीत राज्यपालांच्या नैतिकतेवर तसंच अधिकारांवर ठाकरे गटाने युक्तिवाद केला होता. तर महाविकास आघाडी आणि पर्यायाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर 39 मतांनी फरक पडला असता असं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. ठाकरे गटाने गेल्या सुनावणीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आज शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. (Maharashtra Political News)
आजपासून पुढचे तीन दिवस सलग सुनावणी
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. खंडपीठासमोर आजपासून पुढचे तीन दिवस सलग सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडणार आहेत.